सर्वाना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
आज मदर्स डे म्हणजे आईतल्या आईपणाचा दिवस साजरा करायचा . माझी आई हि एक स्वतंत्र अशा स्वावलंबी, स्वाभिमानी, करारी,कष्टाळू , सतत २४*७ अतिउत्साही अशी ती आहे. आईचा सहवास तसा खूप लहान असताना पासून मिळाला नाही पण ज्या वयात थोडे फार कळायला लागले त्या वयात मी आई बाबांच्या कडे राहायला आले. मी जसे आईला पाहिलंय तेव्हापासून आज पर्यंत अतिशय कष्ट आणि फक्त कष्ट करतानाच पाहिलंय. म्हणजे मला आता एकेकदा असे वाटतंय कि आपण जर आईच्या जागी असतो तर हे सगळे जमले असते का तर नक्कीच नाही असे वाटतंय . मी आईला १० रुपयांसाठी पद्माराजे शाळेत खाऊ घेऊन जाताना पाहिलंय तर कधी २ रुपयांच्या पोळी च्या ऑर्डर साठी सकाळी कितीही कंटाळा आला असला तरी ऑर्डर पूर्ण करताना पाहिलंय.भजी वडे टाळून संसार होतो का अशी वाक्ये ऐकून सुद्धा तिने ते खर करून दाखवले. तिने बाबाना अतिशय बिकट परिस्थितीत खूप धीराने साथ दिली आहे आणि हे सर्व मी स्वतः अनुभवलंय. अतिशय स्वाभिमान असणारी अशी आई. ती कायम आम्हाला नेहमी स्वतः च्या पायावर उभे राहा असे सांगायची . अजूनही तिचे हेच शब्द असतात कि १० रुपये मिळवा पण स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करा .
आई तू खूप इमोशनल नाही प्रॅक्टिकल आहेस. असे मला वाटत ए. पण याच स्वभाव वैशिष्ठ्यांमुळे तिने आज आयुष्यातील हा टप्पा पार केला आहे हे देखील खरे हाये. बाबांच्या पश्चात आमच्या दोघींची लग्न ,सणवार, घर व्यवहार हे सगळे एकटीने करणे हे खूप अवघड आहे. आणि हे सर्व रेटण्याचे जिन्स तिला आजीकडून मिळाले आहेत. नवरा सैन्यात असताना संसार आणि मा हेर च्या लोकांबरोबर जुळवून घेणे तेही खूप कमी वयात हि खूप अवघड गोष्ट आहे.खूप कठीण प्रसंग आणि नात्यातून काढलेले उपाय आईने कित्तेकदा माझ्याबरोबर शेअर केले आहेत. त्यामुळेच आजही काहीही प्रश्न मनात उभा राहिला तर मी लगेच आईला फोन लावते आणि तिच्त्याकडे लगेच उत्तर तयार असते. पूर्वीच्या काळी तर आत्तासारखे मोबाइल हि नव्हते कसे केले असेल असे वाटते.
आई हि अन्नपूर्णा तर आहेच आणि खूप लोकांना मदत आहे . तिच्या हाताला खूप छान चव आहे. मी आईला कामाचा राक्षस म्हणते . अजूनही इतक्या व्हायला तिच्या अंगातील उत्साह आणि बळ पाहून आश्चर्य वाटते. स्वयंपाक घरातील नवनवीन युक्त्या अजूनही तिला सुचत असतात. जुन्यातले जुने आणि नव्यामधील नावीन्य ती आत्मसात करते. कुणावरही अवलंबून राहिलेले तीला आवडत नाही . आईला बर्गर खूप आवडतो . नवनवीन प्रकारच्या सद्य नेसायला आवडतात . तिला पुस्तक वाचायचा छंद आहे खूप पूर्वीपासून . मोबाइलला वर गेम्स खेळायला आवडतात. म्हणूनच म्हंटले जुन्याप्रमाणे हे आधुनिक मोबाइलला फेसबुक, व्हाट्स अँप ,ऑनलाईन शॉपिंग हे सर्वे तिने आत्मसात केले आहे. आजहि मी तिच्याकडून खूप गोष्टी शिकते आहे. अशा माझ्या आईला चांगले आरोग्य लाभुदे आणि आजवर जे कष्ट केले त्याचा उपभोग घेता येउदे. हीच प्रार्थना .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें